दि ७ मे (पीसीबी ) – मावळ लोकसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली असून या मतदानाचे वेळापत्रक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी जाहीर केले आहे.
मावळ तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया ८ व ९ मे रोजी तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) ५ मे व ७ ते ९ मे दरम्यान नोंदवून घेण्यात येणार आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया ७ व ८ मे रोजी तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर ७ ते ९ मे
दरम्यान नोंदवून घेण्यात येणार आहे, असेही मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.