माधव भंडारे, बाळा भेगडे, मुरली मोहळ भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत

0
241

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये 16 उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस, 16 सचिव यांच्यासह इतर महत्वाची पदही जाहीर झाली आहेत. जेष्ठ नेते माधव भंडारे यांंच्यासह मावळचे माजी आमदार व माजी मंत्री बाळा भेगडे, राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, पुणे शहर भाजपचे मुरली मोहळ यांचा प्रदेश कार्यकारणीत समावेश कऱण्यात आला आहे.

पत्रकारपरिषदेत माहिती देताना बावनकुळे म्हणाले, प्रदेश कार्यकारिणीत १०५ पदाधिकारी आणि सदस्य असतील. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी हे उपाध्यक्ष असतील. तसेच इतर उपाध्यक्षांमध्ये सुरेश हळवणकर, संजय बाळा भेगडे, माजी खासदार अमर साबळे, स्मिता वाघ, जयप्रकाश ठाकूर, राजेंद्र गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरिचटणीसपदी माधवी नाईक, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, रणधीर सावरकर, विजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.