माजी विरोधी पक्षनेते अमृत प-हाड यांचे निधन

0
212

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – भापजचे जेष्ठ नेते आणि पिंपरी चिंचवड माजी विरोधी पक्षनेते अमृत सोमाजी प-हाड (वय – ६५) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. दोन वेळा नगरसेवक असलेले पऱ्हाड हे अत्यंत अभ्यासू असे फर्डे वक्ते होते. पक्षाचे दिवंगत तत्कालीन अध्यक्ष अंकुश लांडगे यांचे काळात त्यांनी पालिका सभागृह गाजवले.