माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे निधन

0
565

पुणे, दि. २० (पीसीबी) – पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे आज (बुधवारी) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती अनिल शिरोळे, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

दोन महिन्यांपासून त्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी (बुधवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, हॉटेल व्यावसायिक संग्राम हे त्यांचे पुत्र आहेत.अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी (घोले रस्ता) ठेवण्यात आले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.