महेश सांस्कृतीक मंडळ द्वारा आयोजित “महेश नवमी” कार्यक्रम संपन्न

0
280

पिंपरी, दि.१३ (पीसीबी) – महेश सांस्कृतीक मंडळ (पिंपरी – चिंचवड) द्वारा आयोजित “महेश नवमी” चा कार्यक्रम रविवार १२ रोजी ज्योतिबा मंगल कार्यालय,पिंपरी येथे पार पडला.कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मा.श्रीकिसन भन्साळी, मा.मदनलाल मिणियार, मा.ओम बजाज,मा.गोविंद मुंदडा,मा.शेखर सारडा,मा.कृष्णा राठी,मा.गिरिधरजी काळे उपस्थित होते. डॉ.नवनीत मानधुनी यांचे “अंकशास्त्र व हस्ताक्षर ” चा विषयावर व्याख्यान झाले तसेच गिनिज बुक रेकॉर्ड विजेते डॉ. प्राजक्ता काळे ( वामन वृक्ष कला-बोनसाई आर्ट) यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष पुरस्कार श्री. उमेशचंद्र धुत (सिने अभिनेता),डॉॅ. संदिप बाहेती (पर्यावरण),स्वः प्रियम राठी (सामाजिक कार्य),श्री.जे.के. बजाज व श्री.सचिन नावंदर (कोविड योद्धा) गौरवण्यात आले.
कार्यक्रमास माहेश्वरी समाजातील ९०० परिवार उपस्थित होते.

सुत्रसंचलन श्री. नवनीत राठी यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुलाल सोनी, सतिश सोमाणी, मुरलीधर सारडा, श्रीकांत लढ्ढा, आभिषेक सदानी, शिरीष मानधने, सौ. कांचन भट्टड, सत्यानारयण मालु, अजय लढ्ढा (महेश बॅक, पुणे – डायरेक्टर) व महेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.