महिलेशी गैरवर्तन करत पतीला मारहाण केल्याप्रकऱणी दिघीतील एकाला अटक

0
433

दिघी,दि.०२(पीसीबी) – शतपावली करणाऱ्या महिलेशी गैरवर्तन करून तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या एकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.30) दिघी येथे घडली. याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून परमेश्वर पांचाळ (वय 41 रा.दिघी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जेवणानंतर घराजवळ शतपावली करत होत्या. यावेळी आरोपी हा फिर्यादी यांच्याकडे एकटक पहात होता. यावेळी फिर्यादी यांनी त्याला हटकले असता आरोपीने फिर्यादीच्या नाकावर चावीने मारून त्यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच फिर्यादी यांचे पती तेथे आले असता आरोपीने त्यांनाही डोक्यात दगड मारला. यावरून दिघी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.