महाराष्ट्रात थरार! गोळीबारात रक्तबंबाळ चालकाने वाचवले ३५ प्रवाशांचे प्राण

0
1072

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरावर एक थरार पाहायला मिळाला. एका ट्रॅव्हलर गाडीवर गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत दोनजण जखमी झाले आहेत. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळविहीर ते शिवणगावजवळ एका ट्रॅव्हलर गाडीवर गोळीबार झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा परिसर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलीस स्टेशनं हद्दीत येतो.

10 मार्चच्या रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. गोळीबारमध्ये चालकासह एकजण जखमी असून जखमीवर तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व जखमी नागपूर मानेवाडा येथील रहिवाशी आहेत. गोळीबारानंतर ट्रॅव्हलर चालकांनी तिवसा पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना या घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी तीवसा येथील रुग्णालयात दाखल केले.

नागपूरवरून एमएच 14 जिडी 6955या क्रमांकाची ट्रॅव्हलर गाडी शेगाववरून येत होती. यामध्ये भाविक होते जे शेगाववरुन दर्शन घेऊन येत होते. ट्रॅव्हलर गाडी पिंपळविहीर ते शिवणगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आली. यानंतर एखाद्या चित्रपटाला शोभेल असा थरार सुरु झाला.

एका बोलेरो गाडी ट्रॅव्हलरच्या मागून धावू लागल्याचे चालक आणि प्रवाशांच्या लक्षात आले. त्या बोलेरोने बघता बघता ट्रॅव्हलरचा पाठलाग सुरु केला. बोलेरोमध्ये बसलेल्या व्यक्ती या मद्यधुंद अवस्थेत होत्या. त्यातील काही लोकांनी चालत्या ट्रॅव्हलर गाडीवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.

गोळीबाराचे कारण अस्पष्ट
या गोळीबारात ट्रॅव्हलर चालकाला गोळी मारण्याचा प्रयत्न झाला. पण त्याच्या नशिबाने गोळी हाताला स्पर्श करून गेली. पुढे राकेश कनेर या युवकांच्या खांद्याला गोळी लागल्याने तो जखमी झाला. गाडीतील प्रवाशांना काय प्रकार सुरु आहे? आता काय करावे? काही सुचत नव्हते. पण प्रवाशी खूपच घाबरले होते. दरम्यान हा गोळीबार का करण्यात आला? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.