महायुतीच्या सुनेत्रा पवार याच निवडूण येतील

0
108

बारामतीत पैसे वाटपाच्या आरोपावरून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. विरोधकांना पराभव दिसत असल्याने बिनबुडाचे आरोप करत असल्याचं जाणकार म्हणाले. बारामतीमधून कोणी रडलं, तरी सुनेत्रा पवार या पाच हजाराने का होईना निवडून येतील असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

अवघ्या देशाचं लक्ष असलेल्या बारामती लोकसभेचं मतदान मंगळवारी पार पडलं. रोहित पवार यांनी पैसे वाटपावरून अजित पवारांवर आरोप केले. काही व्हिडिओ ही सोशल मीडियावर सामायिक केले. यावर जानकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. रोहित पवार यांना पराभव दिसत असल्याने असे बिनबुडाचे आरोप करत आहेत, असं जानकर यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, २०१४ ला बारामती शहराने माझ्यावर प्रेम केलं असतं तर पवारांना हरवलं असतं. त्यावेळी मला वेळ कमी मिळाला. चिन्ह ही लोकांपर्यंत पोहचलं नव्हतं. मला वरिष्ठ नेते म्हणत होते, कमळ चिन्हावर लढा. पुढे ते म्हणाले, मला कधीच भाजपच्या कमळ चिन्हावर लढायचं नाही. मेलो तरी चालेल पण बाण, हाथ आणि कमळावर लढणार नाही. मी माझा पक्ष काढला त्याच चिन्हावर दिल्लीला जाणार.