पुणे – महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंडळाचे अध्यक्ष अरूणराव पवार, नितीनराव चिलवंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अराईज इंटरनॅशनल स्कूल, भोसरी इंद्रायणी नगर पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे ऐतिहासिक काम केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामाची माहिती भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून देणार आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मा.ना.अजितदादा पवार यांची भेट त्यांच्या पुणे येथील जिजाऊ निवासस्थानी घेऊन त्यांना बैठकीची सविस्तर माहिती मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष अरूणराव पवार यांनी दिली.
तसेच प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब, मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष अरूणराव पवार, शंकरराव तांबे, रंजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.