महापालिकेतर्फे चिंचवडमध्ये फाळणीबाबतच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

0
293

पिंपरी दि.१२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विभाजन विभिषिका स्मरण दिन (Horrors of partition rememberance day) 14 ऑगस्टच्या अनुषंगाने फाळणीबाबतच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथील पहिल्या मजल्यावरील आर्ट गॅलरी मध्ये हे प्रदर्शन आयोजित केले आहे. फाळणीच्या प्रसंगांमध्ये झालेल्या महासंहारमध्ये बळी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या हालअपेष्टा छायाचित्रात स्पष्ट दिसतात. माहिती सह छायाचित्र असे 52 फोटोग्राफ या प्रदर्शनात मांडले आहेत. 3 फूट बाय दोन फूट अकरातील या प्रिंटवर तत्कालीन वृत्तपत्रांमधील कात्रणे व फोटो यांचे कोलाज पहाता येईल. या घटनेचा 14 ऑगस्ट या स्मृतीनिमित्त हे आयोजन केले आहे.

प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य आहे. शहरातील नागरिकांनी, शालेय मुलांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.