परभणी- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात आले आहेत. नांदेडमध्ये चिखलीकरांसाठी सभा घेतल्यानंतर मोदी रासपचे महादेव जानकर यांचा प्रचार करण्यासाठी परभणीमध्ये आले होते. याठिकाणी मोदींनी भव्य सभा घेतली. मोदींनी यावेळी जानकर यांचा उल्लेख छोटा भाऊ असा केला. यावेळी जानकर यांनी मोदींनी दिलेली शिट्टी वाजवल्याचं दिसून आलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी एनडीए युतीला जनतेचा आर्शीर्वाद हवा आहे. त्यामुळे माझे भाऊ महादेव जानकर यांना विजयी करायचं आहे.’ मोदींनी जानकर यांना जवळ बोलावलं आणि त्यांना शिट्टी हातात दिली. यावेळी जानकर यांनी शिट्टी वाजवत जनतेला अभिवाद केलं. जमलेल्या लोकांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.
देशातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडले. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नांदेड आणि परभणी येथे आले होते. यावेळी मोदी यांनी लोकांना संबोधित केले.
परभणी आत्मनिर्भर भारत बनवण्यात मदत करणार आहे. ही निवडणूक देशाच्या आर्थिक विकासाची नांदी आहे. मला गरिबांच्या वेदना माहिती आहेत. त्यांच्या वेदना कशा कमी होतील याबाबत मी विचार करत असतो. मराठवाड्यात आणलेल्या योजना रोखण्याचं काम विरोधकांनी केलं. मराठवाड्यासाठी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं मोदी यावेळी सभेत म्हणाले.
मोदी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की लोकांनी इंडिया आघाडीपासून दूर राहावं. काँग्रेसला मूळ नाही, शेंडा नाही. जो कोणी काँग्रेसजवळ जातो तो स्वत: निरस होऊन जातो. काँग्रेसच्या काळात इथे निजामासारखं राज्य सुरु होतं. मराठवाड्यातील दुष्काळाचा प्रश्न दूर करण्यात आला नाही. ही संताची भूमी आहे. पण, काँग्रेसकडून या भूमीकडे दुर्लक्ष झालं