Pune

महागाई, बेरोजगारी, इंधनदर वाढीवर जनता तीव्र नाराज, मात्र पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपलाच

By PCB Author

May 30, 2023

पुणे, दि. ३० (पीसीबी) ‘सकाळ-साम’च्या माध्यम समूहाने केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला सर्वाधिक लोकांनी पुन्हा एकदा पसंती दिली आहे. ४२.१ टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून मोदी यांना पसंती दिली आहे. राज्यभरात केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. सकाळच्या राज्यभरातील दोन हजार बातमीदारांनी या महासर्वेक्षणासाठी काम केले. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ, ४८ लोकसभा मतदारसंघातून समाजाच्या सर्व स्तरातून ४९ हजार २३१ जणांचे मत विचारात घेण्यात आले आहे.

सर्वेक्षणाचे निष्कर्ष

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम2) मोदींनी भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली अशी भावना3) महाराष्ट्रात काँग्रेसचं स्थान बळकट4) राहुल गांधींची लोकप्रियता वाढली5) महागाई आणि बेरोजगारी प्रश्न गंभीर6) भाजप मोठा पक्ष पण महाविकास आघाडी कायम राहिल्यास तगडं आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचं योगदान कोणतं, असं आपल्याला वाटतं?

मोदी सरकारचं 9 वर्षातील सर्वात मोठं अपयश कोणतं, असे आपल्याला वाटतं?

लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये आपण केलेलं मतदान योग्य ठरलं, असं आपल्याला वाटतं का?

2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपण 2019 प्रमाणेच मतदान करणार आहात का?

विरोधकांनी मोदी सरकारवर केलेल्या आरोपांपैकी कोणत्या आरोपात आपल्याता तथ्य वाटतं?

2024 ला कोणता पक्ष निवडून यावा, असं आपल्याला वाटतं?

विरोधकांमधून पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला द्याल?

2024 लोकसभा 2024 निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असं वाटतं का?