मराठा समाजाने घातला सरकारचा दहावा

0
270

सरकारच्या विरोधात संतप्त आक्रोश करत केले मुंडन

पिंपरी,दि.३१(पीसीबी) – आरक्षण देण्यात सरकारची चालढकल मराठा समाज संतापला पिंपरी चिंचवड मध्ये केला शिंदे सरकारचा दशक्रिया विधी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर विविध ठिकाणी आमरण उपोषण व साखळी उपोषण करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 दिवसात आरक्षण मागणी मान्य करतो असे आश्वासन दिले होते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला व आंदोलन स्थगित केले परंतु 40 दिवसात हे सरकार आरक्षण मागणी मान्य करू शकले नाही त्यामुळे पुन्हा उपोषण सुरू करावे लागले आज पुन्हा सात दिवस झाले तरी सरकार निर्णय घेऊ शकले नाही त्यामुळे मराठा समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे हे सरकार निष्क्रिय असून मृत पावले आहे अशी मराठा समाजाची ठाम खात्री पटली तेव्हा या सरकारचा दशक्रिया विधी केला पाहिजे या भावनेतून मंगळवार दिनांक 31 रोजी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाज प्रचंड संख्येने एकत्र आला चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराशेजारील स्मशान भूमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहित महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांचा संतप्त मराठा समाजाने दशक्रिया विधी कार्यक्रम केला यावेळी दशक्रिया विधी करून सतीश काळे, नाना वारे तसेच रमेश कदम यांनी मुंडन करून शोक व्यक्त केला याप्रसंगी मीरा कदम सुनिता शिंदे यांचे सहित उपस्थित अनेक महिला भगिनींनी प्रचंड मोठा आक्रोश केला मराठा समाजाची फसवणूक करत असल्यामुळे शिंदे सरकारला लाखोली वाहिली यावेळी सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल शोकाकुल वातावरणात मराठा समाज कार्यकर्ते प्रकाश जाधव,मारुती भापकर,धनाजी येळकर पाटील, कल्पना गिड्डे,राजाभाऊ गोलांडे, काशिनाथ जगताप तसेच मानव कांबळे यांनी मृत महाराष्ट्र सरकार विषयी श्रद्धांजली वाहिली मनोगते व्यक्त केली सुरज भोईर व संपत पाचुंदकर यांनी पसायदान म्हटले याप्रसंगी वैभव जाधव,नकुल भोईर,पांडुरंग प्रचंड राव,रेखा देशमुख,गणेश सरकटे, रत्नप्रभा सातपुते,अशोक सातपुते,प्रकाश बाबर,किरण खोत,संपतराव जगताप,संजय जाधव,सचिन पवार,ब्रह्मानंद जाधव,विष्णू कराळे,नलिनी पाटील सुनील गव्हाणे शितल घरात,रावसाहेब गंगाधरे,सुनील शिंदे,सागर चिंचवडे,सुरज भोईर,बाबा भोईर,जालिंदर खतकर इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी स्मशानभूमीत घाटावर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता.