मुंबईः, दि. २१ (पीसीबी) – मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. सदरील याचिका न्यायालयाने फेटाळली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य शासनातर्फे जून २०२१ मध्ये मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात मागणी केली होती. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आलेली होती.
राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून हा सरकारला धक्का समजला जात आहे. यानंतर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जस्टिस भोसले कमिटीने यासंदर्भात त्रुटी दूर सूचना केलेल्या होत्या, त्यानुसार आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.












































