मनसे मुंबई महापालिकेच्या सर्व जागा लढवणार

0
245

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते. त्यात मनसे नेत्यांचं ‘वर्षा’वर येणं जाणं वाढलं आहे. गणपती दर्शन हे कारण असलं तरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट-मनसे एकत्र लढणार का, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमी मनसेचे नेता संदीप देशपांडे मोठी घोषणा केली आहे. “मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे. आगामी काळातल्या सर्व महानगरपालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार आहे,” असे संदीप देशपांडे म्हणाले.

“आम्ही मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. आम्ही स्वतंत्र्य आहोत, सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झाला आहे,” असे संदीप देशपांडे म्हणाले. दीड लाख कोटींची गुंतवणूक व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 1 लाख रोजगार निर्माण करणारा वेदांता-फॉक्सकॉनचा महाराष्ट्रात येऊ घातलेला सेमीकंडक्टर प्रकल्प अखेर गुजरातने पळवला आहे. मंगळवारी कंपनीने गुजरात सरकारसोबत एमओयूची घोषणा केली.
हा प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यावर देशपांडे म्हणाले, “वेदांतासारखा प्रकल्प राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे, या प्रकल्पामुळे राज्यातील तरुणांना रोजगार मिळाले असते. यात कोणीही राजकारण करू नका,”

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगे गावात मुलं चोरीच्या संशयावरून यूपीतील 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली.याबाबत देशपांडे म्हणाले, “सांगली साधू मारहाणीबाबत सरकारने योग्य कारवाई करावी, सरकार आता बदललं आहे,”