मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह ९१ लाख ७७ हजार रुपयांची दारू जप्त

0
243

पुणे, दि. १६ (पीसीबी) : निरा लोणंद रोडवरील निरा ग्रामपंचायत हद्दीत गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह ९१ लाख ७७ हजार रुपयांची दारू राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ च्या पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रविण परमेश्वर पवार (वय-२३, रा. तांबोळे, ता. मोहोळ जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गोवा राज्यात विक्रीस असलेले टयुबर्ग स्ट्राँग बिअरचे ५०० मि.ली. क्षमतेचे ९० बॉक्स, इंम्पेरियल ब्लू व्हीस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ७९maha२ बॉक्स, इंम्पेरियल ब्लू व्हीस्कीचे ७५० मि.ली. क्षमतेचे ७८ बॉक्स विदेशी मद्यसाठा व बिअर असा ६६ लाख ४५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल ३२ हजार रुपयांचे २ मोबाईल, २५ लाख रुपयांची ट्रक असा ९१ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १५) राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती निरा गावचे हद्दीत, निरा-लोणंद रोड, हॉटेल न्यू प्रसन्ना समोरील रोडवर ता. पुरंदर जि. पुणे येथून गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची मिळाली होती. त्या अनुशंघाने निरा गावचे परीसरातील हॉटेल न्यू प्रसन्ना समोरील रोडवर सापळा रचून ट्रक चालकास, ट्रक रोडच्या कडेला घेण्याचा इशारा केला असता, ट्रक चालकाने सदर ट्रक रोडच्या कडेला उभा केला.

दरम्यान, सदर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्यसाठा व बिअरचा मुद्देमाल मिळून आला. त्यानुसार ट्रकचालकास विचारपूस केली असता त्याने वरीलप्रमाणे नाव सांगतिले. ट्रकची तपसणी केली असता पोलिसांनी गोवा राज्यात विक्रीस असलेले ९१ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.