मंत्रीपदाचे स्वप्नसुध्दा स्वप्नच राहिले

0
408

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) –पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (वय ५९) यांचे दीर्घ आजाराने आज (दि.३) निधन झालं आहे. जगताप हे भाऊ म्हणूनच ओळखले जात होते. मात्र,मंत्री व्हायचं त्यांचं स्वप्नं अपूर्णच राहिलं आहे. त्यामुळे शहरही अद्याप मंत्रीपदापासून दूरच आहे. पात्र असूनही ते मंत्री न झाल्याची सल भाऊंचे हितचिंतक,कार्यकर्तेच नाही,तर पिंपरी-चिंचवडकरांनाही बोचत राहणार आहे.

लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्याकडे कार्यकर्त्यांचं मोठं जाळं होतं. आपल्या कार्यकर्त्यालाही मोठं करणारे नेते अशी प्रतिमा होती.एरवी कार्यकर्ता हा फक्त सतरांज्या उचलण्यापुरता असतो ही बाब भाऊंच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतमात्र अजिबात लागू होत नव्हती. गत टर्मला त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत टेल्कोच्या कामगारांना नगरसेवकच केले नाही,तर त्यांना सत्तारुढ पक्षनेता असं मानाचं पद सुद्धा त्यांनी मिळवून दिलं होतं.राष्ट्रवादी कॉंग्रेसची १५ वर्षाची राजवट उलथवून २०१७ ला पिंपरी पालिकेत भाजपला प्रथमच सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पिंपरी,चिंचवड,भोसरी आणि आकुर्डी या चार गावांच्या नगरपालिकेची महानगरपालिका झाल्यानंतर १९८६ ला झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत भाऊ प्रथमच नगरसेवक म्हणून एस कॉंग्रेसकडून निवडून आले. तेथून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्याचा चढता आलेख गेली ३५ वर्षे सुरुच होता.

चिंचवडमधून आमदार म्हणून निवडून येण्याची २०१९ ला त्यांची हॅटट्रिक झाल्याने व चार टर्म आमदार राहिल्याने मंत्रीपदासाठी त्यांचं नाव घेतले जात होतं. त्यातून पिंपरी-चिंचवडला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळणार होतं. पण,सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपची राज्यात सत्ता आली नाही. कॉंग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनं महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केले अन जगतापांची मंत्री व्हायची संधी हुकली