मंत्रिमंडळात मोदी करणार मोठी खांदेपालट

0
365

नवी दिल्ली, दि.१५ (पीसीबी) – कर्नाटक निकलामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. तसेच पक्षीय पातळीवरही संघटनात्मक बदल होण्याची दाट शक्यता आहे.

नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाली असून, लवकरच मोदी सरकारमध्ये बदल पाहायला मिळतील. पीएमओने सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.