भोसरी परिसरातील राहुल चव्हाण टोळीवर मोका

0
318

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार राहुल चव्हाण आणि त्याच्या साथीदारावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई केली आहे. या दोघांवर एकूण 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

राहुल रमेश चव्हाण (वय 22, रा. दिघी), करणसिंग सुरजीतसिंग भादा (वय 19, रा. दिघी) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींवर भोसरी, दिघी, चिखली, सांगवी, यवत पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, मारामारी, दुखापत, घरफोडी, चोरी, जबरी चोरी असे एकूण 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसारचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्या विरोधात मोकाची कारवाई करण्यात आली आहे.