भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी

0
180
  • मुख्यमंत्र्यांना शिरुर मधून द्यायची होती, छगन भुजबळांना उमेदवारी
  • डॉ.अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट

भोसरी : मुख्यमंत्री एकनाथ शिरुर लोकसभा मतदार संघातुन मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यायची होती. पण, भुजबळांनी नकार दिल्याने ती उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्यात आल्याचा गौप्यस्फोट खासदर डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलच उधाण आलय.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर, शहराध्यक्ष तुषार कामठे, धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, मानव कांबळे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात डॉ. कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. माझ्या समोर सक्षम उमेदवार असता तर बोलायला मजा आली असती. मात्र, अनेक पक्षातून बेडूक उड्या घेऊन आलेल्या उमेदवारावर बोलणे योग्य नाही.

विरोधकांची केवलवाणी परिस्थिती झाली असल्याचा निशाणा त्यांनी साधला आहे. शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. भुजबळांनी नकार दिल्याने ही उमेदवारी आढळरावांना देण्यात आली. त्यामुळं ते सक्षम ही नाहीत, आणि बाय चॉईस ही उमेदवार नाहीत. अश्या वयस्कर व्यक्तीवर काय बोलायचं असा खोचक सवाल ही कोल्हेंनी केला.