भिडे वाडा मुक्तीचा मार्ग मोकळा…, राष्ट्रवादीकडून पेढे वाटून स्वागत

0
187

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – १८४८ रोजी भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली देशातल्या पहिल्या शिक्षिका माता सावित्रीबाई स्मारक अनेक वर्ष अतिक्रमण आणि न्यायालयाच्या न्यायप्रविष्ठ बाबी होत्या, त्यामुळे १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी निर्णय झाला असून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात जिथे देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.

कारण, भिडे वाड्यासंदर्भातला उच्च न्यायालयात सुरू असलेला खटला पुणे महापालिका आणि राज्य सरकारने जिंकला आहे. त्यामुळे लवकरच या शाळेच्या ठिकाणी स्मारक उभारलं जाणार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कार्यालयामध्ये शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने सर्वांनी पेढे वाटून आणि जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. गोरक्ष लोखंडे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, प्रदेश सरचिटणीस सचिन औटे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा कविताताई खराडे ,विद्याताई शिंदे, माधवी सोनार, इत्यादींसह सर्व प्रमुख कार्यकर्ते हजर होते. या निर्णयाचे स्वागत समाजातल्या सर्व शहरातून होत असून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय झाल्यानंतर पहिल्यांदा सावित्रीबाई आणि महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा जल्लोष करणारा पक्ष म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने या सर्व महापुरुषांच्या विचारधारेवर चालतो असं मत सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं.