भारत लवकरच जपानला मागे टाकेल

0
207

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या दशकात अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. सध्या भारत हा जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र मानले जात आहे. दरम्यान, अलीकडेच S&P ग्लोबल मार्केटने केलेल्या दाव्यानुसार, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत लवकरच जपानला मागे टाकेल. 2030 पर्यंत भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे
इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, S&P ग्लोबल मार्केटने अंदाज लावला आहे की 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 7.3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. त्यानंतर भारत जपानला मागे टाकून आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल. S&P ग्लोबल मार्केटने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 2021 आणि 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग खूप मजबूत होता. भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आर्थिक वर्ष 2024 पर्यंत 6.2 टक्के ते 6.3 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत येतो. त्याच वेळी, एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.8 टक्के होता. गेल्या काही वर्षांत देशात परदेशी गुंतवणूक वाढली आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत त्याचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे.

भारत जर्मनीलाही टाकणार मागे
या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, जपान व्यतिरिक्त भारत 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकेल. सध्याच्या काळात भारताचा GDP 2022 मध्ये 3.5 ट्रिलियन डॉलर आहे, जो 2030 पर्यंत वाढून 7.3 ट्रिलियन डॉलर होईल. या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजीसाठी वाढत्या देशांतर्गत मागणीला जबाबदार धरण्यात आले आहे.

अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश
अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिकेचा जीडीपी हा 25.5 ट्रिलियन डॉलर आहे. तर 18 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जपानचा 4.2 ट्रिलियन डॉलर्स आणि जर्मनीची अर्थव्यवस्था ही 4 ट्रिलियन डॉलर्सची आहे. दरम्यान, S&P ग्लोबल मार्केट व्यतिरिक्त, इतर अनेक जागतिक संस्थांनी देखील असे दावे केले आहेत. सध्याच्या काळात भारताचा GDP 2022 मध्ये 3.5 ट्रिलियन डॉलर आहे, जो 2030 पर्यंत वाढून 7.3 ट्रिलियन डॉलर होईल.