भारत आणि कॅनडामधील वादात दोन मोठ्या देशांचा कॅनडाला पाठिंबा

0
261

विदेश,दि.२२(पीसीबी) – भारत आणि कॅनडामधील राजकीय विवाद शिगेला पोहोचलाय. ब्रिटन आणि अमेरिकेने या वादावर चिंता व्यक्त केलीय. या वादादरम्यान अमेरिका आणि ब्रिटनच्या कॅनडाविषयी सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसत आहे. दोन्ही देशांनी म्हटलं की, ते भारताला त्यांचा प्रमुख आशियाई प्रतिस्पर्धी चीनचा संतुलनच्या रुपात पाहत आहे, यामुळे त्यांच्या संबंधांना हानी पोहोचवू इच्छित नाहीत. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी निज्जर यांची हत्या झाली होती. या हत्येमागे भारतीय गुप्तचरांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. त्यानंतर भारताने कॅनडाच्या राजदुतांना देश सोडण्यास सांगण्यात आलं. यावर ओटावा यांनी चिंता व्यक्त केली. त्यावरून अमेरिका आणि ब्रिटेनने भारताला आवाहन केलंय. भारताने कॅनडाच्या राजदूत कमी करण्यासाठी भारताने कॅनडावर दबाव आणू नये आवाहन अमेरिका आणि ब्रिटेननं केलं आहे.

दरम्यान कॅनडाने केलेले आरोप भारताने फेटाळून लावलेत आहेत. यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले, ” भारतातून कॅनडाच्या राजदूत निघून गेल्याने आम्ही चिंतेत आहोत.” मतभेद मिटवण्यासाठी जमीन पातळीवर राजदुतांची आवश्यकता असते. आम्ही भारत सरकारकडे आग्रह केलाय की, त्यांनी कॅनडाच्या राजदुतांना कमी करण्यासाठी कॅनडावर दबाव टाकू नये आणि कॅनडाच्या तपासकार्यात मदत करावी. मिलर म्हणाले की, भारत राजनैतिक संबंधांवरील १९६१ च्या वियना कन्वेंशनच्या अंतर्गत आपल्या कर्तव्य जपेल. यात कॅनडाच्या राजनैतिक मिशन मान्यता प्राप्त सदस्यांना प्राप्त असलेल्या विशेषाधिकारांचा देखील समावेश आहे. वॉशिंग्टननं म्हटलं की, कॅनडाने केलेल्या आरोपांची दखल त्यांनी गांभीर्याने घेतलीय. तसेच लंडनसोबत भारताने हत्येचा तपासकार्यात मदत करावी असा आग्रह केलाय.

ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालायाच्या एका प्रवक्त्यानं म्हटलं की, आम्ही भारताच्या निर्णयाशी सहमत नाहीत. दरम्यान भारताने कॅनडाच्या आरोपानंतर भारतातील राजदुतांना देश सोडण्यास सांगितलं होतं. निज्जरची हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. त्यानंतर भारताने ओटावाला भारतातील राजदूत कमी करण्यास सांगितले होते. त्यानंतर भारतातून ४१ राजदुतांना कॅनडाला परत जावे लागले आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की अमेरिका आणि ब्रिटन भारतासोबतचे संबंध खराब करू इच्छित नाहीत. कारण ते भारताला प्रमुख आशियातील चीनचा प्रतिस्पर्धी मानत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभाग आणि ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाने कॅनडा- भारत विवादावरून केलेले विधाने ही दिल्लीवर केलेली थेट टीका आहे.