पुणे, दि. २०(पीसीबी)- भारतीय अर्थव्यवसस्था ही उद्योग हा सगळ्यांच्या फायद्यासाठी करावा ह्या तत्वावर आधारित आहे. आपण उद्योगाचे मालक नसून केवळ विश्वस्त आहोत असा विचार मनात ठेवून काम करावे. आपण दुसर्यांकरिता काम करतो, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी एमसीसीआयए, पुणे येथे त्यांच्या भाषणात केले.
श्री दीपक करंदीकर, अध्यक्ष, एमसीसीआयए यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. प्रशांत गिरबने, महासंचालक एमसीसीआयए यांनी चेम्बरची माहिती दिली.
भारतीय अर्थव्यवस्थेमागील तत्वज्ञान इतर देशांपेक्षा वेगळे आहे. इतिहासकालीन अर्थव्यवस्थेतील दाखले देत भागवतांनी भरपूर उत्पादन, संयमित उपभोग आणि विकेंद्रित उत्पादनावर भाष्य केले. भारतीय उद्योगाचा पाया हा आपल्याबरोबर समाजाचा फायदा बघण्यावर आहे असंही ते म्हणाले. जसं एखादा शेतकरी स्वतःसाठी अन्नधान्य पिकवत नाही, तर तो समाजासाठी शेती करतो. त्याप्रमाणे उद्योगजगताने सुद्धा व्यापक दृष्टिकोन ठेवून समाजाच्या भल्याचा विचार करावा. कारण समाजाच्या भरभराटीतच वैयक्तिक भरभराट दडलेली आहे.
उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या अनेक अंगांना स्पर्श करतांना डॉ भागवत यांनी औद्योगिकरण, शाश्वत ऊर्जेचा वापर, आणि उद्योगात मानवीय दृष्टिकोन ठेवण्याचा आग्रह केला. संपत्ती हि केवळ पैशात न मोजता बुद्धीची संपत्ती ही तितकीच महावत्वाची आहे हा भारतीय संस्कृतीतील विचार आपण विसरता काम नये असं ते म्हणाले. संपत्तीचा विनियोग कसा करावा ह्याबद्दल बोलताना त्यांनी सहा भागांमध्ये ती कशी सारख्या प्रमाणात वापरावी ह्याबद्दल माहिती दिली. त्यामध्ये स्वतःच्या उपभोगासाठी, भविष्याची तरतूद, धार्मिक कार्यांसाठी, समाजासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि निकडीच्या प्रसंगांसाठी संपत्तीचे सामान भाग करावेत असे ते म्हणाले.
सुमारे ३०० च्या संख्येने प्रेक्षक या प्रसंगी उपस्थित होते.
या सत्रात अर्थव्यवस्थेवरील प्रश्नांची समर्पक उत्तरे डॉ. मोहन भागवत यांनी दिली. येत्या २०-३० वर्षात भारतात लक्षणीय सुधारणा होईल, आणि त्यासाठी आपण आपले कर्म सात्यत्याने करत राहावे असे ते म्हणाले.
श्री. प्रशांत गिरबने, महासंचालक एमसीसीआयए यांनी आभारप्रदर्शनाचे भाषण केले.