भारतातील मुस्लीमांत तालिबानी मानसिकतेला थारा नाही, दोषींवर कठोर कारवाई करा

0
237

अजमेर, दि. २९ (पीसीबी) – राजस्थानमधील उदयपरू येथे शिवणकाम व्यावसायिकाची हत्या झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातोय. राजस्थानमध्ये काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपींनी या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दरम्यान, अजमेर दर्गा दिवान जैनुल अबेदिन अली खान यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी भारतातील मुस्लीम देशात तालिबानी मानसिकतेला थारा नाही. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

“कोणताही धर्म मानवतेविरुद्ध हिंसेला प्रोत्साहन देत नाही. विशेष करुन इस्लाम शांततेचा पुरस्कार केला जातो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका गरिब माणसावर हल्ला करण्यात आला आहे. इस्लामध्ये हा अपराध आहे,” असे खान यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच, “मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची सरकारला विनंती करतो. भारतातील मुस्लीम आपल्या देशात तालिबानी मानसिकता कधीही येऊ देणार नाहीत,” असेदेखील खान यांनी म्हटले आहे.

राजस्थानमधील उदयपूर येथे एका शिवणकाम व्यावसायिकाची मंगळावारी (२८ जून) हत्या करण्यात आली. त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी आंदोलन केले जात आहे. कन्हैयालाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान आहे.