नागपूर, दि. १९ (पीसीबी) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा न्यायालयात बावनकुळे यांनी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गरिबांना धान्य मिळतं नव्हत म्हणून त्यांनी आंदोलन केलं होत. चंद्रशेखर बावनकुळे यांना जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकार दिलेलं धान्य महाविकासआघाडी सरकार नागरिकांपर्यंत पोहचवत नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी आंदोलनदेखील केलं होतं. याप्रकरणीच त्यांना अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
दरम्यान, विदर्भ दौऱ्यावर असणारे राज ठाकरे यांनी बावनकुळे यांच्या घरी जात भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पुन्हा एकदा युतीची चर्चा होत आहे. असे बोलले जात आहे.