भाजपला १६ लोकसभा मतदारसंघात भाकरी फिरवावी लागणार

0
346

पुणे, दि. ७ (पीसीबी) – महाराष्ट्रातील भाजपकडे असलेल्या पैकी विद्यमान १६ लोकसभा मतदारसंघात भाकरी फिरवावी लागणार असून उमेदवारीत बदल केला नाही तर या जागा धोक्यात येऊ शकतात असा धक्कादायक निष्कर्ष पहिल्या टप्यातील सर्वेक्षणात निघाला आहे. तर भाजपच्या मित्रपक्षांच्या विद्यमान जागांचीही यशाची वाट बिकटच असल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर ‘पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो’ (प्राब) संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाच्या पहिला टप्प्या पूर्ण झाला असून अंतिम दुसऱ्या टप्प्यामधील सर्वेक्षणाचे काम सुरु आहे त्यानंतर अंतिम निष्कर्ष अहवालामध्ये राजकीय पक्षांची स्थिती स्पष्ट होईल. सर्व राजकीय पक्षामधील स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींनी ‘प्राब’ संस्थेच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहन ‘पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो’ (प्राब) संस्थेच्या वतीने केले आहे. राज्यातील काही मतदारसंघातून अनेक अधिकारीही निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असून त्यांची पहिली पसंती भाजप पक्षाकडे आहे.

भाजपकडून विद्यमान आमदार व मंत्र्यांना देखील लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्यामुळे काही मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. काही मंत्री महोदय लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक नसून त्यांच्या ऐवजी अन्य पर्यायी उमेदवाराचे नाव पुढे केले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातील वॉर रूमच्या महासंचालकपदाचा नुकताच राजीनामा देणारे सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार यांचे देखील नाव हिंगोली व नांदेड लोकसभा मतदारसंघात स्थानिक पातळीवर चर्चिले जात आहे. तर जळगावचे भूमिपुत्र, ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा लाचलुचपत विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांचे देखील नाव जळगाव लोकसभा मतदारसंघात स्थानिक पातळीवर चर्चिले जात आहे. विद्यमान मंत्री गिरिश महाजन यांचे देखील नाव रावेर लोकसभा मतदार संघातून मतदारांमध्ये चर्चिले जात आहे. तसेच विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण तर राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून तसेच भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात स्थानिक पातळीवर चर्चिले जात आहे. केंद्रीय मंत्री राज्यसभा सदस्य पियुष गोयल, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे देखील लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत.

शिवसेनेच्या एकूण १८ खासदारांपैकी १३ खासदार हे सध्या शिंदे गटात आहेत. या १३ जागांवर भाजपच्या पाठिंब्याने निवडणूक लढवण्याची शिंदे गटाची रणनीती आहे. मात्र, भाजप शिंदे गटासाठी १३ पैकी १३ जागा सोडण्यास राजी नाही. कारण लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे देखील बदललेली आहेत त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांना कमळाच्या चिन्हावर लढण्याच्या प्रस्ताव भाजप मान्य करेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. परंतु काही जागांवर यशाच्या मेरिटवर शिंदे गटाला असे निर्णय घ्यावे लागतीलच. तसेच राष्ट्रवादीच्या जागांवर देखील ऐनवेळी पूर्वनियोजित रणनीती राबविण्यावर भर आहे. राष्ट्रवादीच्या विद्यमान सर्वच जागा पहिल्या टप्यातील सर्वेक्षणात धोक्यात असल्याचे निष्कर्ष निघत आहेत.
पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झालेली नाही आणि ही जागा वर्षभरापासून रिक्त आहे. पुणे लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे व चुकीची उमेदवारी निवडीची पुन्हा चूक होणार नाही याची दक्षता भाजप पक्ष घेत आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुणे शहराध्यक्षपदी केलेली निवड सर्वसमावेशक नेतृत्वाची नाही असा काही प्रमाणात नाराजीचा सूर देखील पक्षांतर्गत निघत आहे तर कसबापेठ विधानसभा मतदारसंघाबाहेर पुणे शहर भाजप कार्यालय नुकतेच स्थलांतरित केले जात असून पुण्यात भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी अर्धा डझनहून अधिक जण इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी निवडीची कसरत भाजप पक्षश्रेष्ठींना करावी लागणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या सत्तेतील सहभागामुळे पुणे शहरातील स्थानिक पातळीवर राजकीय समीकर
णे पूर्णपणे बदलली आहेत. पालकमंत्री पद बदलाच्या घटनेचाही काहीसा परिणाम पक्षसंघटनेत झाल्याचे स्थानिक पदाधिकारी मान्य करीत आहेत.