भाजपचे माजी नगरसेवक सुरेश गदिया यांचे निधन

0
290

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्वीकृत सदस्य आणि भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सुरेश हस्तीमल गदिया (वय- ६६) यांचे आज मंगळवारी पहाटे ह्दयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, तीन भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. चिंचवड स्टेशन येथील पंकज ट्रेडिंग कंपनी या प्रख्यात स्टेशनरी दुकानचे ते संचालक होते. भाजपचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते होते. भाजपच्या शहर कार्यकारणीत ते कार्यरत असत. सन २००२ मध्ये महापालिकेत स्वीकृत सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. शहरातील व्यापाऱ्यांचे संघटन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. केशवनगर येथील नवीन स्मशानात सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.