भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
247

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ६८ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. १५) रात्री पावणे बारा वाजता पुणे-मुंबई महामार्गावर डी मार्ट समोर, चिंचवड येथे झाला.

प्रदीप दादासाहेब कदम (वय ६८, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अभिषेक प्रदीप कदम (वय ३८, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील त्याच्या दुचाकीवरून निगडीकडून पिंपरीच्या दिशेने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जात होते. चिंचवड डी मार्ट येथे आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून एक रिक्षा भरधाव वेगात आला. रिक्षाने फिर्यादी यांच्या वडिलांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी यांचे वडील गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर रिक्षा चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.