बेकायदेशीरपणे फटाके बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा

0
310

चिखली,दि.३०(पीसीबी) – बेकायदेशीरपणे फटाके बनवणाऱ्या कारखान्यावर चिखली पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाख रुपये किमतीचे स्फोटक पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 29) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सोनवणे वस्ती चिखली येथे करण्यात आली.

विक्रांत राज देशमुख (वय 36, रा. कसबा पेठ, पुणे), संतोष टायप्‍पा शिवशरण (वय 44, रा. पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार चंद्रशेखर चोरगे यांनी चिखली पोलीस ठाण्यात यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून लोकांच्या जीवनात धोका निर्माण होईल अशा परिस्थितीमध्ये फटाके बनविण्यासाठी लागणारी स्फोटके बाळगली. यासाठी आरोपींनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 500 रुपये किमतीचे स्फोटके आणि केमिकल जप्त केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.