हिंजवडी, दि. ७ (पीसीबी) – बावधन येथे आईची वाट पाहत थांबलेल्या तरुणाचा मोबाईल फोन तीन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 5) रात्री निसान सर्व्हिस शोरूम समोर, बावधन येथे घडली.
प्रद्युम्न अनिलकुमार काळगी (वय 23, रा. सुतारवाडी, बावधन बुद्रुक) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी रात्री मुंबईवरून पुण्याला आले. रात्री पावणे बारा वाजता बावधन येथील निसान शोरूम समोर ते उतरले. त्यांच्या आईची वाट पाहत थांबले असताना एका दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी 10 हजारांचा मोबाईल फोन फिर्यादीच्या हातातून हिसकावून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.