बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार

0
737

पुण्यातील गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही. त्यातच पुण्यात बांधकाम व्यवसायिकावर फायरिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली. काल सायंकाळची घटना जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या वन प्लस शोरूम समोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

धीरज दिनेशचंद्र आरगडे बांधकाम व्यवसायिकावर स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. हल्लेखोर स्विगीसारखे वस्त्र परिधान करून हेल्मेट घातले होते. त्या दोघांनी पिस्टल काढून दोन वेळा फार करण्याचा प्रयत्न केला मात्र फायर न झाल्याने दोन आरोपींनी पुढे पळ काढला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून शिवाजीनगर पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.