बनावट कागदपत्रांच्या आधारे पावणे बारा लाखांची फसवणूक

0
283

वाल्हेकरवाडी, दि. ३ (पीसीबी) – बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका विकून एका व्यक्तीची ११ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १ जून २०११ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी येथे घडला.

उमेश बाळकृष्ण पावणे (वय ३६, रा. विशाल नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजपाल उर्फ रामपाल सिंग कोहली आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपाल आणि एका महिलेने फिर्यादी उमेश यांना सन २०११ मध्ये वाल्हेकरवाडी येथील वाहेगुरू निवास या इमारतीमधील एक सदनिका विकली. ही सदनिका बनावट कागदपत्रे बनवून ते खरे असल्याचे भासवून विक्री केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच या व्यवहारात फिर्यादी उमेश यांची ११ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.