बकरी ईदच्या दिवशी गायींची कत्तल नको…

0
247

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी डीजीपी महाराष्ट्र यांना पत्र लिहून बकरी ईदच्या दिवशी गायींची कत्तल होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

नार्वेकर यांच्यापूर्वी, ‘ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे (एआययुडीएफ) वादग्रस्त खासदार आणि आसाम जमियत उलेमाचे प्रदेशाध्यक्ष मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी “देशातील हिंदू समाज गाईला माता मानतो. त्यामुळे मुस्लीम समुदायाने येत्या बकरी ईदच्या दिवशी गाईची कुर्बानी टाळावी,” असे आवाहन केले होते.
मुस्लिम धर्मियांचे एक धर्मगुरु बद्रुद्दीने यांनी सुध्दा ईद च्या दिवशी गाईची कुर्बानी नसावी, असे म्हटले आहे.