फोटो काढण्यावरून तरुणांमध्ये हाणामारी

0
214

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – महापालिकेच्या उद्यानात फोटो काढण्यासाठी गेलेल्या तरुणांना फोटो काढण्यास मज्जाव केल्याने मज्जाव करणाऱ्यांचे फोटो काढणाऱ्या तरुणांनी ऐकले नाही. त्यावरून फोटो काढणाऱ्या तरुणाला दगडाने मारून जखमी करण्यात आले. ही घटना गुरुवारी (दि. २२) दुपारी साडेतीन वाजता एमआयडीसी भोसरी मधील उद्यानात घडली.

योगेश परियार (वय २५), टेकराज सोनार, राजेश सोनार (वय २५, सर्व रा. एमआयडीसी भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मण कालूसिंग सोनार (वय २०, रा. लांडगेनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण, त्यांचा चुलत भाऊ चंद्रेश सोनार, विक्रम सोनार आणि मित्र मोहन विश्वकर्मा मनियार इंडस्ट्रीज कंपनीजवळ असलेल्या महापालिकेच्या उद्यानात फोटो काढण्यासाठी गेले होते. उद्यानात फोटो काढत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादीस फोटो काढण्यास मज्जाव केला. फिर्यादींनी आरोपींचे न ऐकता फोटो काढणे सुरु ठेवले. त्यावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. योगेश परियार याने फिर्यादीचा चुलत भाऊ चंद्रेश यास दगडाने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.