प्रख्यात अभिनेत्रीने केली आत्महत्या

0
677

अभिनेत्री अमृता उर्फ अन्नपूर्णा पांडेने आत्महत्या केली आहे. ती भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करायची. तिने बिहारमधील भागलपूर इथं शनिवारी आदमपूर घाट रोडवरील दिव्यधाम अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. अमृताला बऱ्याच दिवसांपासून चित्रपटात काम मिळत नव्हतं, त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती व त्यातूनच तिने जीवन संपवलं, अशी माहिती समोर येत आहे.

अमृता पांडेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळताच जोगसर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एफएसएल पथकासह घटनास्थळी तपास केला. घटनास्थळावरून तिने गळफास घेण्यासाठी वापरलेली साडी, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. कुटुंबियांच्या माहितीनुसार अपर्णाने भोजपुरीसह, हिंदी चित्रपट, मालिका, वेब सीरिज आणि जाहिरातीमध्ये काम केलंय. यासंदर्भात एबीपी लाइव्हने वृत्त दिलं आहे.

‘आयुष्य दोन बोटींवर चाललं आहे, मी माझी बोट बुडवून मार्ग सुकर केला’, असं व्हॉट्सॲप स्टेटस आत्महत्येपूर्वी अमृताने ठेवलं होतं. जोगसर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी एका महिलेने अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. माहिती मिळताच एसएचओ कृष्ण नंदन कुमार सिंह, एसआय राजीव रंजन आणि शक्ती पासवान घटनास्थळी पोहोचले. फ्लॅटवर पोहोचल्यावर अमृताचा मृतदेह बेडवर पडलेला होता.