पोलिसांत तक्रार दिली म्हणून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न

0
306

देहु ,दि. १२ (पीसीबी) –  दारुला पैसे दिले नाहीत तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून तिघांनी मिळून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 11) देहुफाटा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मयूर विनायक उकले (वय 22, रा. देहुफाटा) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश विजय सोळंकी (वय 18) याला अटक केली आहे. त्याच्यासह लखन शिंदे व दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन व राकेश यांनी फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. ते न दिल्याच्या कारणावरून तसेच फिर्यादी यांनी आरोपींच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या रागातून आरोपींनी फिर्यादीस मारहाण केली. लोखंडी रॉडने डोळ्यावर, नाकावर, चेहऱ्यावर, मारून जखमी करत शिवीगाळ केली. या मारहाणीत फिर्यादी बेशुद्ध पडले. त्यांना एका कारच्या खाली फेकून आरोपी पळून गेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.