पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 25) आणि गुरुवारी (दि. 27) मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली.
गुणवंत शिवलिंग बुलबुले (वय 54), दिनेश गोरख वडतिले (वय 25), केशव गोरख वडतिले (वय 22), दोन महिला (सर्व रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 30 वर्षीय पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीचे आरोपी महिलेसोबत मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून गुणवंत याने मंगळवारी रात्री फिर्यादी महिलेशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर गुरुवारी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शेरेबाजी करत पुन्हा गैरवर्तन केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.