पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार; परिसरात दहशत

0
631

जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच तरुणाला मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी साडेचार वाजता काजळेवाडी, चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

सौरभ विजय गायकवाड, आदित्य अशोक चोरगडे, मोन्या गायकवाड, सुयश यादव व इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनीषकुमार मिथिलेश मिश्रा (वय 24, रा. चर्होली, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा 3 मे रोजी फिर्यादी सोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून जमाव जमवला. आरोपींनी फिर्यादीला कोयत्याने वार करत हाताबुक्क्याने मारहाण केली. शिवीगाळ करून आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.