पुन्हा लॉकडाऊन…? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

0
394

नवी दिल्ली,दि.२१(पीसीबी) – जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. कोविड-19 प्रकरणांमध्ये नव्याने वाढ होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी महत्त्वाची बैठक बोलवली आहे. कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने चिंता वाढल्या आहेत. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा कहर सुरु केला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढत आहे.

अँटी टास्क फोर्सचे वरिष्ठ सदस्य आणि कोविड लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी माहिती दिली की, चीनमधील परिस्थितीबाबत भारताला काळजी करण्याची गरज नाही. चीनमध्ये पुन्हा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. पण भारताबाबत बोलायचे झाले तर येथे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

भारत आणि चीनच्या परिस्थितीत खूप फरक आहे. चीनमध्ये सध्या कोरोनाचा स्फोट झाला आहे. कारण येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले नाही.चीनने अनेकदा निर्बंध लादले. पण काही वेळाने लोकांचा संयम सुटला आणि चिनी सरकारविरोधात लोकं रस्त्यावर उतरले. त्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आली. पण याचा फटका आता चीनला बसला आहे. चीनमध्ये विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. रूग्णांना रूग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीयेत. रुग्णांना आवश्यक औषधेही मिळत नाहीयेत.

चीनमध्येन 8० लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. जगातील 10 टक्क्यांहून अधिक लोक पुढील तीन महिन्यांत संसर्गास बळी पडू शकतात.