आयपीएस अधिकाऱ्याने विधवा महिलेकडे केली लैंगिक सुखाची मागणी – पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्य़ात दाखल केला गुन्हा

0
182

पुणे, दि. ६ (पीसीबी) – आयपीएस अधिकाऱ्याने विधवा महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील आंबेगाव येथील आयपीएस अधिकारी नीलेश अशोक अष्टेकर यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ३१ वर्षीय महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत ठाण्याच्या कळवा येथील ३१ वर्षीय विधवा महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आयपीएस अधिकारी अष्टेकर यांनी पीडित महिलेला फेसबुकवरून मॅसेज केला होता. या दरम्यान दोघांचे संभाषण चालू होते. अष्टेकर यांच्या बोलताना पीडित महिलेने आपल्या बहिणीचा मुलगा पोलिस भरतीची तयारी करत आहे. मात्र, मुंबईत झालेल्या परीक्षेत तो नापास झाला, अशी माहिती अष्टेकरांना दिली.

यानंतर तुमच्या बहिणीच्या मुलाला पोलिसात नोकरी मिळेल याची खात्री देतो असे सांगून अष्टेकरांनी तिचा नंबर घेतला. बहिणीच्या मुलाला पोलिसात नोकरी लावायची असल्याने ती अष्टेकरच्या संपर्कात होते. नंबर घेतल्यानंतर अष्टेकरांनी अनेकदा महिलेला व्हाट्सअपवरून मॅसेज केले. त्यानंतर अश्लील भाषेत बोलण्यास सुरूवात केली. महिलेला अश्लील फोटो देखील पाठवून शरीर सुखाची मागणी केली. अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. महिलेच्या तक्रारीनंतर आयपीएस अधिकारी अष्टेकरांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.