पीजी होस्टेल मधून तीन लॅपटॉप, दोन मोबाईल चोरीला

0
211

वाकड, दि. ०४ (पीसीबी) – थेरगाव येथे अम्मा पीजी होस्टेल मधील एका खोलीत चोरीची घटना उघडकीस आली. यामध्ये चोरट्यांनी तीन लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन चोरून नेले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री साडे अकरा ते रविवारी (दि. 3) सकाळी सात वाजताच्या कालावधीत वाकड घडली.

कमल किशोर सतपाल (वय 21, रा. अम्मा पीजी होस्टेल, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या खोलीतून अज्ञात चोरट्याने त्यांचा 10 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, त्यांचा मित्र सौरभ श्रीवास्तव यांचा लॅपटॉप रुपये किमतीचा लॅपटॉप आणि पंकज गरगडे यांचा 10 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप. तसेच निहाल भोपतराव यांचा पाच हजारांचा मोबाईल फोन आणि आदित्य वाबळे यांचा पाच हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेला आहे. खोलीच्या उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करून चोरट्याने ही चोरी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.