पिंपळे निलखमध्ये काँग्रेसकडून जाहीरनाम्याचे घरोघरी वाटप करत प्रचार

0
146
  • संजोग वाघेरे पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन

पिंपरी, (प्रतिनिधी) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ पिंपळे निलख येथे काँग्रेसच्या वतीने घरोघरी जाहीरनाम्याचे वाटप करण्यात आले. दहा वर्षे भाजपने खोटी आश्वासने देऊन देशवाशियांची घोर फसवणूक केली आहे. फसव्या भाजप सरकाराल हटविण्यासाठी संजोग वाघेरे पाटील यांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले, फसव्या भाजपाला हटविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

या वेळी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि आसाम राज्याचे प्रभारी पृथ्वीराज साठे, संजय साठे, दादा टकले, अमित कांबळे, नितीन थोपटे, आकाश साठे, ऋषिकेश साठे, माणिक भांडे, सचिन टकले, आकाश जगताप, माऊली घट्टे, नितीन साठे, संकेत जगताप, दिनेश टकले, संदीप कामठे, यश गायकवाड, मनीष वाघेरे, सूरज पोळ, योगीत काटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षात त्यांना एकही ठोस काम करता आले नाही. महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. सर्वसामान्याचे जीने अवघड होऊन बसले आहे. तसेच, मावळ लोकसभा मतदारसंघात आजही गेल्या दहा वर्षात अनेक कामे प्रलंबित आहेत, नगरी समस्या तशाच आहेत. त्यामुळे काही अंशी तथाकथित खासदारांवर मावळ लोकसभेत नाराजी दिसून येते. म्हणून, समाजसेवेला प्रथम प्राधान्य देणारा, सामान्यांच्या सुख-दुःखात सामील होणारा सच्चा माणूस अशी प्रतिमा असणाऱ्या संजोग वाघेरे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते काम करीत आहेत. घरोघरी मशाल चिन्ह पोहचवत मावळच्या शिवसेनेच्या शिलेदार लोकसभेत पाठवण्यासाठी वाघेरे पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन पृथ्वीराज साठे आणि काँग्रेस पदाधिका-यांनी मतदारांना केले.