पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू व्हावे; ‘पीसीसीएफ’चे राज ठाकरे यांना साकडे

0
196

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रो मार्ग या मार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे. यासाठी पुढाकार घेण्याचे साकडे पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) च्या पदाधिका-यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना घातले.

मुंबई शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरमचे राजीव भावसार , तुषार शिंदे, सूर्यकांत मुथियान आदी उपस्थित होते. निगडी ते पिंपरी विस्तारित मार्ग 4.41 किलोमीटर आहे. यामध्ये तीन मेट्रो स्टेशन आहेत. चिंचवड, आकुर्डी व निगडी अशी तीन स्टेशन आहेत. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. राज्य शासन 170 कोटीचा भार उचलणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका उर्वरित भार उचलणार आहे.