पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘शहर सरचिटणीस’पदी जयंत शिंदे

0
280

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – जयंत शिंदे यांची पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘शहर सरचिटणीस’पदी निवड झाली. पिंपरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर मा.आझमभाई पानसरे आणि शहराध्यक्ष मा.तुषार कामठे आदी मान्यवर उपस्थित होते. जयंत शिंदे हे पेशाने ब्रँड कन्सल्टंट असून, कॉर्पोरेट,कल्चरल आणि पोलिटिकल ब्रँडिंगच्या क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आह. ‘ब्रँड सायन्स’चे जाणकार असलेल्या जयंत शिंदे यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होईल. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.