पिंपरी चिंचवड शहरात कुत्र्यांची दहशत

0
271

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) -काल रात्री कामावरून येताना एका तरुणावर कुत्र्यांनी हल्ला केला.लहान मुलांवर तर कुत्रे बिनधास्त हल्ले करतात. असे अनेक हल्ले झाले आहेत पण कारवाई शून्य. जेष्ठ नागरिक आणि महिलांनासुद्धा या कुत्र्यांची याची भीती वाटते. भाजपाच्या सत्तेच्या काळात कुत्र्यांच्या नसबंदीवर खर्च केलेले पैसे वाया गेले आहेत असेच चित्र आहे.

किमान अन्याय झालेल्या सत्ता पक्षातील एखाद्या कार्यकर्त्याला कुत्र्याच्या नसबंदीचे शे पाचशे कोटींचे टेंडर दिले तर कदाचित काही पैसे कुत्र्यांच्या नसबंदीवर खर्च होऊन नागरिकांना कुत्र्यांच्या त्रासापासून थोडासा दिलासा मिळेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार,पिंपरी चिंचवड शहराचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील म्हणाले.

पैसे गेले तर जाऊद्या पण शहरातला नागरिक कुत्र्यांमुळे त्रस्त आहे याकडे एकतरी नेत्याने लक्ष दिले पाहिजे.शहरासाठी झटणारा सत्तेतला कोणी नेता असेल तर कुत्र्यांच्या दहशतीतून आणि गुलामगिरीतून पिंपरी चिंचवडकरांची सुटका करावी ही सत्तेतील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना विनंती. प्रशासन यावर कारवाई करत नाही आणि सत्ता असूनही जनतेचा त्रास आणि प्रश्न सुटत नसतील तर ती सत्ता काय कामाची असे माधव पाटील म्हणाले.