पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला बेदम मारहाण

0
412

वाकड, दि. १४ (पीसीबी) – पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला मेहुणा आणि सासऱ्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जावई गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री दहा वाजता विशालनगर, वाकड येथे घडली.

आदित्य रजनीकांत मंगरुळे (वय 26, रा. हडपसर, पुणे) असे जखमी जावयाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील तेजराव रणीत (वय 34), तेजराव रणीत (दोघे रा. वाक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य यांची पत्नी माहेरी वाकड येथे आली आहे. त्यामुळे ते पत्नीला भेटण्यासाठी वाकड येथे आले. त्यावेळी मेहुणा स्वप्नील आणि सासरे तेजराव यांनी आदित्य यांना डोळ्यात मिरची पूड टाकून, चाकूने वार करत त्यांना काठीने मारून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.