पत्नीने घटस्फोटाची मागणी करताच पतीने जे केले ऐकून तुम्हालाही फुटेल घाम; पेट्रोल ओतून….

0
223

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) –  पुणे पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिल्यानंतर चिडलेल्या पतीने १० दुचाकी आणि ४ चाकी गाड्यांवर पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कदायक घटना कोंढव्यातील अश्रफ नगर परिसरातील अलिप टावर समोर सोमवारी (ता.१३) पहाटे ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. टेरेन्स डॉमिनिक जॉन असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी कोणतेही काम धंदा करत नव्हता म्हणून पत्नीने त्याच्या विरोधात घटस्फोटासाठी अर्ज दिला होता.दरम्यान, पत्नी सोबत राहायचे असल्यामुळे त्याने अनेक वेळा तिला घटस्फोट देऊ नको असे सांगितले तरी सुद्धा तिच्या पत्नीने अर्ज दाखल केला. घटस्फोटाच्या अर्जावरून चिडलेल्या जॉनने पत्नीची दुचाकी जाळायचे ठरवले आणि आरोपी जॉन पार्किंगमध्ये असलेल्या इतर दुचाकींसह परिसरातील चारचाकी, रिक्षा आणि इतर दुचाकी यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या.

पोलिसांनी टेरेन्स डॉमिनिक जॉनला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र आरोपीवर काय कारवाई होणार? ज्यांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. अशा नागरिकांना मदत मिळणार का हे पाहणे देखील अत्यंत महत्वाचे आहे.