पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन

0
322

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. संसदे भवनच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांना या इमारतीचे उद्घाटन करण्याबाबत विनंती केली. 5 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी सरकारला संसदेसाठी नवीन इमारत बांधण्याची विनंती केली होती. यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाची पायाभरणी करण्यात आली. या संसदेची नवनिर्मित इमारत विक्रमी वेळेत दर्जेदारपणे तयार करण्यात आली आहे.सध्या संसदेची नवीन बांधलेली इमारत जिथे भारताच्या गौरवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्यांना अधिक समृद्ध करण्याचे आणखी एक काम केले जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संसदेच्या सध्याच्या इमारतीत लोकसभेतील 550 तर राज्यसभेत 250 सदस्यांची बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संसदेच्या नवीन बांधलेल्या इमारतीत लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील 384 सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन लोकसभेच्या सभागृहातच होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या नवीन संसद भवनाची इमारत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने तयार केली आहे. 26 मे रोजी मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. ही नवीन संसद भवन चार मजली असून जर आपण त्याची महत्वाची ही वैशिष्ट्य आहेत की हांते 970 कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे.

64 हजार 500 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या नवीन संसद भवनाला 3 मुख्य दरवाजे आहेत. त्यांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावे देण्यात आली आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीमुळे लोकप्रतिनिधींना त्यांची कामं अधिक चांगल्या पद्धतीने करता येतील.