“नातं विश्वासाचे” क्लब (नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि रिसर्च) च्या युवकांची तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात “प्लास्टिक मुक्त वारी – वर्ष २ रे”

0
284

दिवे घाट, दि. २९ जून (पीसीबी) – ‘प्लस्टिक मुक्त वारी ‘ या उपक्रमांतर्गत ” नातं विश्वासाचे ” या क्लब ने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत तळेगाव येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिरिंग व रिसर्च मधील NSS च्या स्वयंसेवकांना सहभागी होण्याची संधी मिळाली.

“नातं विश्वासाचे”क्लब व एन एस एस (नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि रिसर्च )च्या एकूण ८० युवकांच्या व ८ शिक्षकांच्या समूह तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. खरं तर जास्त करून सर्वांची ही पहिलीच वारी पण ३२ किलोमीटर चा प्रवास सर्वांनी सुखरूप पणे पूर्ण केली.

दोन्ही पालखी चे दर्शन घेत पुणे स्टेशन पासून सासवड पर्यंतची ३२ किलोमीटर ची पाय वारी पूर्ण केली. त्यात सर्वात कठीण टप्पा मानला जाणाऱ्या ४ किलोमीटर चा दिवे घाट सर्व ८० विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. दिवे घाटात सर्व विध्यार्थ्यांनि एकूण १०८ पोती ,प्रत्येकी १-२ पोती भरून प्लस्टिक गोळा केला. दिवे घाटात डोंगरांवर , दरीत व कानोकोऱ्यातून जमेल तितका प्लास्टिक स्वच्छ करण्याचा प्रयत्न या सर्वांनी केला.

नातं विश्वासाचे १२ युवक कु.शिवराज नलावडे (संस्थापक), आदेश खेडेकर, पवन पाटील, गौरी अल्हाट, प्रतिक मराठे, शरद चांदेल, दीक्षांत चंदनशिवे , अमेय अलाटे , वरद पाठक, संगीत जोंधळे व आरती बैलमुळे यांनी या अभियानाचे नेतृत्व केले. प्रा.भीमराव गायकवाड व प्रा.किशोर खैरनार यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

स्वच्छता मोहीमसोबतच त्यांनी ठिकठिकाणी केळी, खिचडी , लाडू आणि पाणीच्या बाटल्यांचे ही वाटप केले. तुकाराम महाराजांच्या पालखी समोर फुगडी आणि नृत्य करत पोलीस, सैनिक आणि वारकऱ्यां सोबत वारीचा आनंद देखील घेतला.

“माऊलींच्या व तुकाराम महाराजांची वारी करण्याचे स्वप्न आज अस्तित्वात उतरले. आपण फक्त मोबाइल वर पाहणारा तो विडिओ जेव्हा आपण प्रत्येक्षात अनुभवतो तेव्हा आपल्याला खऱ्या ऊर्जेची जाणीव होती . जणू की विठ्ठलच आपल्याला त्याच्या भेटीला बोलावून घेतोय असा भास होतो. आपली संस्कृति आपण अशीच सहभाग घेत जपली पाहिजे. ” – असे पवन पाटील याने अनुभव व्यक्त करताना पत्रकारांना सांगितले.